maharashtra

कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधानांचे प्रशासनाला महत्वपूर्ण आदेश

Share Now


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन शनिवारी उशीरा कोविड आढावा बैठक घेतली. त्यामध्ये कोरोनावर उपाययोजना करताना आणि लसीचे उत्पादन वाढवताना देशातील उपलब्ध क्षमतेचा पूर्ण वापर करा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी खासगी आणि सार्वजनिक भागिदारी वाढवा असाही आदेश त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत देशातील लसीची स्थिती, ऑक्सिजनचा सप्लाय, औषधे आणि व्हेन्टिलेटरची उपलब्धता या विषयांवर सखोल माहिती घेतली आणि त्याचा विविध पैलूंवर चर्चा केली.

पंतप्रधानांनी यावेळी कोरोनाचे परिक्षण, ट्रॅकिंग आणि उपचार याला कोणताही पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचाही पंतप्रधानांना आढावा घेतला. देशात रेमडेसिवीरची उपलब्धता लवकरात लवकर करुन द्यावी, असा आदेशही त्यांनी दिला. कोरोनाच्या उपचारामध्ये अॅन्टी व्हायरल म्हणून उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीरचे उत्पादन आता दुप्पट करण्याची परवानगी केंद्र सरकारने औषध कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक महिन्यात होणारे 38.8 लाख रेमडेसिवीरचे उत्पादन आता 78 लाख होणार आहे. तसेच खासगी औषध कंपन्यांनी रेमडेसिवीरच्या किंमतीमध्येही घट केल्यामुळे कोरोना विरोधातील लढाईला मोठा हातभार लागणार आहे.

पंतप्रधानांनी त्याचबरोबर व्हेंटिलेटरची उपलब्धता आणि कोरोनाच्या लसीकरणाची स्थिती जाणून घेतली. देशातील कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाचा वेग आणखी वाढवण्याचा आदेश त्यांनी दिला. कोरोनाच्या लसीच्या तुटवड्याच्या बातम्या येत असताना त्यांनी लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक भागिदारी वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

The post कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधानांचे प्रशासनाला महत्वपूर्ण आदेश appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3txp1VR
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!