maharashtra

जगामध्ये अस्तित्वात आहेत अशीही ‘हटके’ रेस्टॉरंट्स

Share Now

rest


काही दशकांपूर्वी ‘रेस्टॉरंट’ म्हटले, की अनेक तऱ्हेचे खाद्यपदार्थ जिथे मिळतात ते ठिकाण, इतकीच या ठिकाणाची व्याख्या असे. पण काळ बदलला तशी ही व्याख्याही बदलली. आता ग्राहाकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने रेस्टॉरंट साठी देखील ‘थीम्स’चा वापर होऊ लागला. त्या त्या ‘थीम’ प्रमाणे देशी आणि विदेशी खाद्य पदार्थ तर रेस्टॉरंट मध्ये मिळू लागलेच, पण थीमनुसार रेस्टॉरंटची सजावट, बैठकव्यवस्था या वरही विशेष भर दिला जाऊ लागला. त्यामुळे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ किती चविष्ट आहेत, या व्यतिरिक्त त्या रेस्टॉरंटचा ‘अँबियन्स’ किती आगळा आहे आणि थीम किती ‘हटके’ आहे या गोष्टीही ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाच्या ठरत असतात. ग्राहकांची ही विचारसरणी लक्षात घेऊन जगभरातील अनेक रेस्टॉरंट्स खरोखरीच ‘हटके’ पद्धतीने बनविण्यात आली आहेत.
rest1
अमेरीकेतील टेक्सास प्रांतामध्ये ‘कॉलेज स्टेशन’ या ठिकाणी असलेल्या ‘हार्वी व़ॉशबँगर्स’ या रेस्टॉरंटने ग्राहकांसाठी भोजनाचा आस्वाद घेत असताना येथे उपलब्ध असलेल्या ‘लॉन्ड्रोमॅट’मध्ये कपडे धुण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘लॉन्ड्रोमॅट’ ही संकल्पना परदेशांमध्ये अतिशय सामान्य असून, या ठिकाणी अनेक वॉशिंग मशीन्स उपलब्ध करवून दिलेली असतात. आपल्या सवडीप्रमाणे येथे येऊन काही ठराविक पैशांच्या मोबदल्यात नागरिकांना या मशीन्सचा वापर करून कपडे धुवून घेता येतात. ज्यांच्या घरांमध्ये वॉशिंग मशीन्सची सुविधा उपलब्ध नाही, किंवा जे नागरिक वसतीगृहांमध्ये राहत असतात, त्यांच्यासाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरते. ‘हार्वी वॉशबँगर्स’ या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना त्यांच्या मनपसंत खाद्यपदार्थांच्या जोडीने आपले कपडेही धुवून घेण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे.
rest2
अमेरिकेतील कॉलोराडो मध्ये असलेले ‘एअरप्लेन रेस्टॉरंट’ ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय ठरत असते. १९५०च्या दशकातील बोईंग केसी ९७ या विशालकाय विमानाचे रूपांतर आता एका रेस्टॉरंटमध्ये करण्यात आले असून, या रेस्टॉरंटमध्ये अनेक सुंदर प्राचीन वस्तूंचा व छायाचित्रांचा संग्रह पाहण्याचा आनंद ग्राहकांना घेता येतो. त्या शिवाय अनेक एअरलाईन्सचे प्राचीन मेन्यू देखील या रेस्टॉरंटमध्ये प्रदर्शित केले गेले आहेत. अॅमस्टरडॅम, ब्रसेल्स आणि लंडन येथे असणारी ‘द अव्होकाडो शो’ या रेस्टॉरंट्सच्या मालिकेची खासियत याच्या नावातच दडली आहे. या रेस्टॉरंट्समध्ये अव्होकाडो हे फळ येथील सर्वच पदार्थांमध्ये समाविष्ट आहे.
rest3
मालदीव्हज् बेटांपैकी माधू आयलंड वर असणाऱ्या ‘अॅटमॉस्फीयर रिसोर्ट’मध्ये असलेले ‘M6m’ नामक रेस्टॉरंट समुद्राच्या खाली बनलेले असून, अतिशय आलिशान अशा या रेस्टॉरंटमध्ये समुद्री जलचर पाहण्याचा आनंद घेत भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी ग्राहकांना मिळत असते, तर जगामध्ये अनेक ठिकाणी हौशी खवैय्यांना ‘डीनर इन द स्काय’ अनुभवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रेस्टॉरंट्स मध्ये ग्राहकांना डायनिंग टेबलशी जोडल्या गेलेल्या खुर्च्यांवर बसवून त्यांना सेफ्टी बेल्ट्सने बांधण्यात येते. त्यांनतर एका क्रेनच्या सहाय्याने हे संपूर्ण डायनिंग टेबल, ग्राहक आणि ते खाणार असलेल्या भोजनासकट, एका क्रेनच्या सहाय्याने शंभर फुटांच्या उंचीवर उचलले जाते. त्यामुळे हवेमध्ये अधांतरी तरंगत भोजन घेण्याचा थरारक अनुभव ग्राहकांना घेता येतो. ही संकल्पना मूळ बेल्जियम देशामध्ये अस्तित्वात आली असली, तरी आता जगभरात अनेक ठिकाणी ही संकल्पना आता अतिशय लोकप्रिय ठरत आहे.

The post जगामध्ये अस्तित्वात आहेत अशीही ‘हटके’ रेस्टॉरंट्स appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3n4ni83
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!