maharashtra

वजन घटवा श्रीमंत व्हा

Share Now


वजन कमी करणे आणि शरीराचे आकारमान मापात ठेवणे हे केवळ दिसण्याच्याच बाबतीत आणि आरोग्याच्याच बाबतीत फायदेशीर असते असे नाही तर ते आर्थिक बाबतीतही फायदेशीर ठरणारे असते. म्हणून अमेरिकेतले डॉक्टर्स आता सडसडीत व्हा आणि मोठी बचत करा असा संदेशच द्यायला लागले आहेत. डॉक्टरांनी ही बाब लोकांचे शरीर आणि त्यांची कमायी यांचा आर्थिक स्थितीशी मेळ घालूनच दाखवून दिली आहे. अमेरिकेतले तज्ज्ञ डॉक्टर्स हे केवळ मोघम निष्कर्ष कधी काढत नाहीत. ते आपल्या म्हणण्याला नेहमीच पुराव्यानिशी सादर करीत असतात. त्यांनी पैशाचा आणि शरीराचा हा संंबंध अनेक लोकांच्या पाहणीनंतरच सादर केला आहे. जाड माणसाला अनेक प्रकारच्या नुकसानीला तर सहन करावेच लागते पण तो जाडी कमी करण्यासाठीही बराच खर्च करीत राहतो आणि त्यात त्याचा पैसा जाऊन बचतीवर परिणाम होतो.

जाड माणसे आळसामुळे कामावर जाण्याचा कंटाळा करतात आणि त्यांचे खाडे होऊन उत्पन्न कमी होते. त्यांच्या जाड असल्याने होणार्‍या नुकसानीत ५० टक्के नुकसान या खाड्यांमुळे होते. ते कामावर येतात आणि तिथे काम करतात पण त्यांच्याच्याने जाडीमुळे कामही कमी होते. त्यातूनही त्यांच्या उत्पन्नात घट होते. मुळात काम कमी आणि त्याही कामात खाडे यामुळे सडपातळ माणूस आणि लठ्ठ माणूस यांच्या कमायीत फरक पडत जातो. अनेक लोेकांचे वजन, त्यांचे काम आणि त्यांची कमायी यांचा फार तपशीलाने अभ्यास करून अमेरिकेतल्या ओबेसिटी या नियतकालिकात त्याचे निष्कर्ष छापण्यात आले आहेत. जाड लोक असे आळशी असतील तर त्यांचेच नाही तर त्यांच्या देशाचेही उत्पन्न कमी होते.

थोडक्यात काय तर लठ्ठ लोकांची मोठी संख्या असलेला देश तुलनेने गरीब असतो. जपान हा उद्योगी देश आहे कारण या देशात सडपातळ लोकांची संख्या मोठी आहे आणि जाड लोक तुलनेने कमी आहेत. त्याचा परिणाम म्हणून तिथे लोकांची आणि पर्यायाने देशाची मिळकत जास्त आहे. जाडी वाढली की मधुमेह, रक्तदाब आणि हृदय विकार होण्याचीही शक्यता वाढते. समाजात या रोगाचे प्रमाण वाढले की एकुण पन्नाशीतच थकलेले लोक सगळीकडे दिसायला लागतात आणि लोक याच वयात व्हॉलिंटरी रिटायर्ड होण्याच्या गोष्टी बोलायला लागतात.खरे तर याच वयात अनुभव वाढल्याने कमायी वाढत असते पण या वयात वार्धक्याच्या छाया दिसायला लागतात. देश मागे पडतो.

The post वजन घटवा श्रीमंत व्हा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3ecqBpF
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!