maharashtra

डीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या एकाच छत्रीद्वारे 2 टीव्हीवर पाहू शकतात वेगवेगळे चॅनल्स

Share Now

DTH


जर तुमच्या घरात दोन टीव्ही असतील आणि दोन्ही टीव्हींसाठी तुम्ही वेगवेगळ्या डिश किंवा केबल कनेक्शन वापरत असाल तर आता असे करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. खर तर एकाच डिशला घरातील दोन्ही टीव्हींना तुम्ही जोडू शकतात. त्याचबरोबर दोन्ही टीव्हीवर वेगवेगळे चॅनल्स दिसतील. तुम्हाला दोन कनेक्शनचे पैसे देण्याची आवश्यकता या ट्रिकमुळे भासणार नाही.

दोन टीव्हीत एकाच डीटीएचद्वारे वेगवेगळे चॅनल्स पाहण्यासाठी एक एक्स्ट्रा सेटटॉप बॉक्सची आवश्यकता आहे. कारण फक्त एकाच टीव्हीचे चॅनल्स एका सेटटॉप बॉक्सवर बदलता येतील. दोन टीव्हीसाठी यामुळे दोन सेटटॉप बॉक्सची गरज आहे. LNB IN पोर्ट सेटटॉप बॉक्समध्ये असतो. पण एका सेटटॉप बॉक्समध्ये LNB OUT पोर्ट असलेला सेटटॉप बॉक्स आपल्याला हवा आहे. तो पोर्ट सेटटॉप बॉक्समध्ये नसेल तर टीव्ही पाहू शकणार नाहीत.

दोन सेटटॉप बॉक्स मधील एक MPEG-4 आणि दुसरा MPEG-2 सेटटॉप बॉक्स असणे आवश्यक आहे. MPEG-2 सेटटॉप बॉक्समध्ये LNB IN आणि LNB OUT दोन्ही पोर्ट असतात. डीटीएचची मेन केबल या सेटटॉप बॉक्सच्या इन पोर्टमध्ये लावायची आहे. तर याच्या LNB OUT पोर्टमधून दुसऱ्या केबलचे कनेक्शन MPEG-4 च्या LNB IN मध्ये फीट करायची आहे. MPEG-4 बॉक्सला दुसऱ्या खोलीत ठेवा. आता तुम्ही दोन्ही टीव्हीवर वेगवेगळे चॅनल्स पाहू शकतात.

The post डीटीएच कोणत्याही कंपनीचे असू द्या एकाच छत्रीद्वारे 2 टीव्हीवर पाहू शकतात वेगवेगळे चॅनल्स appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2QuKwrM
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!