maharashtra

असा आहे या फर्निचरचा इतिहास

Share Now

sofa


आजकाल कोणत्याही घरात गेलात तरी थोडेफार फर्निचर तरी दिसतेच. किंवा नवीन घर घेतले कि फर्निचर कसे, कोणते करावे याची चर्चा सुरु होते. पण या फर्निचरचा काही इतिहास असेल असे आपल्या स्वप्नातही येत नाही. पण आजकाल गरज बनलेल्या फर्निचरला इतिहास आहे आणि तो मनोरंजक आहे. अर्थात फर्निचर ही कल्पना पाश्चात्य असल्याने तेथील वापरातील फर्निचरविषयी आपण जाणून घेणार आहोत.

कोच किंवा सोफा हा शब्द नुसता उच्चारला तरी आपल्या नजरेसमोर दिवाणखाण्यात ठेवलेले विशिष्ट फर्निचर लगेच येते. कोच या शब्दाचे मूळ काउच हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा अर्थ आहे आराम करणे. १७ व्या शतकात आरामशीर झोपण्यासाठी कोच किंवा सोफा डिझाईन केला गेला. अमेरिकेत त्याला कोच आणि इंग्लंड मध्ये सोफा म्हणतात. अरबी शब्द सोफ्फाका असा असून त्याचा अर्थ ज्यावर गालिचे आणि उश्या ठेऊन आरामदायक बनविता येईल असा फरशीचा भाग. यालाच दिवान असा पर्शियन शब्द आहे. सेटी हा सोफ्यासारखा पण थोडा लहान प्रकार. पूर्वी लग्नाळू मुलांशी चर्चा करण्यासाठी सेटीचा वापर केला जात असे.

wardrobe
वॉर्ड रोब- मुळचा हा शब्द गार्डरोब. हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ राजा महाराजा ज्या खोलीत कपडे, त्यांचे दागदागिने व अन्य मौल्यवान सामान ठेवत, त्याचंही देखभाल करणारा गार्ड, रोब्ज म्हणजे कपडे. यासाठी खोलीत एक दगडी शेल्फ असे आणि त्यात कपडे टांगले जात. त्यातच दागिन्यांसाठी जागा असे. नंतर त्याचे रूप बदलले आणि वॉर्डरोब हा फर्निचरचा एक महत्वाचा भाग बनला. यात कपाट असते आणि त्यात कपडे व अन्य वस्तू ठेवल्या जातात.

windsor
विंडसर चेअर आजकाल अमेरिकन घरात मुख्यत्वे दिसत असल्या तरी त्या जगभर प्रसिद्ध आहेत त्या या खुर्च्यांच्या युनिक डिझाईनमुळे. सॉलिड सीटच्या मागे स्पिंडल्स असलेल्या या चेअर १६ व्या शतकात हाताने बनविल्या जाऊ लागल्या आणि १८ व्या शतकात स्टायलिश मानल्या जाऊ लागल्या. या चेअरचे नाव इंग्लंडमधील विंडसरवर आधारित असून ब्रिटीश राजपरीवाराचा विंडसर पॅलेस प्रसिद्ध आहे. त्यामुळे या चेअर राजेशाही थाटाच्या मानल्या जातात. अमेरिकेत त्या पोहोचल्या ते १७३० सलत आणि तिच्या डिझाईन मध्ये थोडा बदल झाला.

autman
ऑटमन हे आरामदायक फुटरेस्ट असून त्याचे नाव ऑटमन एम्पायरवरून आले आहे. हे साम्राज्य १२९८ ते १९०८ या काळात होते. १८ व्या शतकात ऑटमन युरोप मध्ये पोहोचले. त्यात प्रथम कुशन सीट चपटी आणि लांब होती आता ती गोल आकारात येते.

The post असा आहे या फर्निचरचा इतिहास appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3akKDgI
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!