maharashtra

यामुळे होतात नवरा-बायकोत सतत भांडणे – संशोधन

Share Now

couple
चहाच्या कपातील वादळ सारखे नवरा-बायकोचे भांडण असते असे म्हणतात. पण दररोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून ते होत असेल तर ती बाब गंभीर असते. पती किंवा पत्नी अशावेळी स्वतःलाच दोष देत कुढत बसतात. मात्र, यासंदर्भात अमेरिकेत झालेल्या एका संशोधनामध्ये एक आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आला आहे.
couple1
दोघांचे नाते हे त्यांच्या गुणसुत्रांवर म्हणजेच त्यांच्या जीन्सवर अवलंबून असते ही बाब अमेरिकेत दररोज भांडणाऱ्या 1000 दशलक्ष जोडप्यांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये, प्रकर्षाने समोर आली. या रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी, त्यांच्या संबंधाविषयी आणि त्यांच्या साथीदाराच्या व्यवहाराविषयी प्रश्न विचारण्यात आले.
couple2
या रिसर्चमध्ये मानवी शरिरातील हार्मोन्सवर सर्वात जास्त प्रभाव ‘ऑक्सीटोसिन रिसेप्टर’ या जीन्सता असतो ही बाब समोर आली. लग्नानंतर काही दिवसातच याच कारणामुळे नवरा-बायकोंची वागणूक बदलते. हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त होताच मनाचे संतुलन बिघडते आणि त्यातून निर्माण झालेला तणाव अनेकदा रागाच्या स्वरूपात नवरा बायकोवर किंवा बायको नवऱ्यावर काढते.
couple3
रिसर्चमध्ये लग्न झाल्यानंतर अतिशय आनंदात असलेल्या जोडप्यांना सहभागी करण्यात आले होते. दरम्यान, जेव्हा त्यांच्या हार्मोन्सची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्यात OXTR नावाचे जीन्स संशोधकांना आढळलेच नाही. त्या आधारे रिसर्च संशोधकांनी दोघांचे नाते हे त्यांच्या जीन्सवर अवलंबून असते असा निष्कर्ष काढला.

The post यामुळे होतात नवरा-बायकोत सतत भांडणे – संशोधन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3albjxN
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!