maharashtra

ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी धावणार रेल्वेची ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’

Share Now


नवी दिल्ली : राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आता भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार असून ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे. कळंबोली स्टेशनवरून उद्या म्हणजेच 19 एप्रिलला विशाखापट्टणमच्या दिशेने ही ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना होणार आहे. महाराष्ट्रातून दहा टँकर जाणार आहेत.

रेल्वेची लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना होणार आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) टँकर रेल्वेने हलवू शकतात का याचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे संपर्क साधला होता. रेल्वेने तातडीने एलएमओ वाहतुकीची तांत्रिक शक्यता शोधून काढली. फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टँकरसह रोरो सेवेद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करावी लागेल, असे रेल्वेने सुचवले.

रेल्वे बोर्डाचे अधिकारी, राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात 17 एप्रिल रोजी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित मुद्द्यांवर बैठक पार पडली. टँकर हे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडून दिले जातील, असा निर्णय झाला. रिकामे टँकर कळंबोली / बोईसर रेल्वे स्थानकांमधून ऑक्सिजन लोड करण्यासाठी वायझॅक आणि जमशेदपूर / रौरकेला / बोकारो येथे पाठविले जातील.

रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज आणि ओव्हर हेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या मर्यादेमुळे अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ते टँकरच्या विविध वैशिष्ट्यांपैकी, रोड टँकर टी 1618 चे मॉडेल लावले जाणे शक्य असल्याचे आढळले. हे टँकरर 1290 मिमी उंचीसह सपाट वॅगनवर ठेवले जाणार आहेत. वाहतुकीच्या सर्व चाचण्या रेल्वेकडून घेण्यात आल्या आहेत.

The post ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी धावणार रेल्वेची ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3eaOMF8
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!