maharashtra

व्हिडिओ ट्विट करत प्रियंका गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Share Now


नवी दिल्ली – देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांचा आकडा आणि मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असताना, महाराष्ट्रात सध्या रेमडिसेवीर औषधाच्या मुद्द्यावरून राजकीय कलगी तुरा सुरू आहे. या वादात आता काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही उडी घेतली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका करत निशाणा साधला आहे. रेमडेसिवीरचा साठा करणे हे मानवतेविरुद्ध असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.


देशाच्या कानाकोपऱ्यातून जेव्हा रेमडेसिवीरची मागणी होत आहे. जीव वाचविण्यासाठी रेमडेसिवीर मिळावे, म्हणून लोक प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. अशा वेळी, एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजप नेत्याने रेमडेसेवीरची साठेबाजी करणे, मानवतेविरुद्ध असल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या या ट्विट सोबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस ठाण्यातील पोलिसांना धारेवर धरतानाच एक व्हिडिओ जोडला आहे.

प्रियंका यांच्या फडणवीसांवरील टीकेला आता भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. अभ्यास करून प्रियंका गांधी यांनी बोललायला हवे. राज्यात काँग्रेस सत्तेत आहेत. महाराष्ट्रात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आणि बेडचा तुटवडा जाणवत आहे. लोक मरत आहेत. महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरत आहे. प्रियंका गांधी यांनी किमान महाराष्ट्र सरकारकडून तरी याचा हिशोब मागायला हवा, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

The post व्हिडिओ ट्विट करत प्रियंका गांधींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2RMvpdX
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!