maharashtra

आता एसटीचे ड्रायव्हर राज्यात आणणार ऑक्सिजन टँकर – अनिल परब

Share Now


मुंबई: राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटकाळात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुडवड्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यावरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने उभे ठाकले आहेत. ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. तर रेल्वेकडून ऑक्सिजन एक्सप्रेस सोडली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण, राज्य सरकारला ऑक्सिजन आणण्यासाठी ड्रायव्हर मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटीचे ड्रायव्हर ऑक्सिजन टँकर आणतील, अशी माहिती दिली.

पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती अनिल परब यांनी दिली. राज्याला ऑक्सिजनची गरज आहे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. यामुळे कुठल्याही अडथळ्याशिवाय ऑक्सिजनचे टँकर इच्छितस्थळी लवकर पोहोचतील. कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन टँकर वाहतुकीत अडथळा येणार नसल्याची ग्वाही अनिल परब यांनी यावेळी दिली.

ऑक्सिजनचा राज्यात तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे केंद्राकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यासाठी समन्वय साधण्याचे काम परिवहन विभाग करत आहे. लॉकडाऊनमुळे टँकर्स ड्रायव्हर गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

राज्य सरकारला ऑक्सिजन व रेमडेसिवीर वितरणाचे अधिकार दिले आहेत तर, राज्य सरकार केंद्राकडे कशाला परवानगी मागेल. ज्या गोष्टी केंद्र सरकारच्या हाती आहेत, त्याची मागणी केंद्र सरकारकडेच केली जाणार. दुसरीकडे कोणाला मागणार, असा खोचक सवाल परब यांनी यावेळी विचारला. कोरोना परिस्थितीत परिवहन खाते अतिशय तत्परतेने काम करत आहे. दोन- तीन विषय सध्या आम्ही हाताळत असल्याचेही परब म्हणाले.

The post आता एसटीचे ड्रायव्हर राज्यात आणणार ऑक्सिजन टँकर – अनिल परब appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3v0TCvl
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!