maharashtra

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

Share Now


नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांपासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वचजण अडकत असल्याचे दिसत आहेत. आता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयात मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनास्थिती हाताळण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी कोरोना साथीशी लढण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच लसपुरवठय़ास चालना देण्यासाठी एचआयव्ही-एड्सच्या औषधांप्रमाणे परवाना अनिवार्य करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले उचलावीत, अशी सूचनाही केली आहे.

पत्रातून मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला कोरोनाविरोधातील लढाईसाठी पाच कलमी कार्यक्रमांचा सल्ला देखील दिला आहे. या पाच कलमी कार्यक्रमात,
१. पुढील सहा महिन्यांसाठी किती लसींची ऑर्डर दिली आहे हे जाहीर करावे
२. राज्यांना अपेक्षित असेलेला साठा कसा पुरवला जाईल याबाबत संकेत द्यावेत.
३. राज्यांना फ्रंटलाईन वर्कसची श्रेणी ठरवण्यासाठी सूट द्यायला हवी.
४. लस निर्मात्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी सवलती द्या.
५. वापरासाठी परवानगी दिल्या गेलेल्या कुठल्याही लसीच्या आयातीसाठी परवानगी द्यावी या मुद्यांचा समावेश आहे.

The post माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3n1s06y
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!