maharashtra

राज्यातील कडक लॉकडाऊनबाबत एकमत; मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा

Share Now


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले असून लॉकडाऊनबाबतची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिली आहे. हा लॉकडाऊन पुढील 15 दिवसांसाठी असणार आहे. लॉकडाऊनबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील. लॉकडाऊन बाबतच्या गाईडलाईन्स काही वेळातच जारी करण्यात येणार आहेत.

लॉकडाऊन अत्यंत कडक असला पाहिजे. गेल्यावर्षी जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, तसाच हा लॉकडाऊन हवा. राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाची स्थिती चिंताजनक होत असल्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन केले.

लॉकडाऊन आवडीचा विषय नाही, पण आज लॉकडाऊनशिवाय पर्याय देखील नसल्यामुळे मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि हा निर्णय उद्यापासून लागू करतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

The post राज्यातील कडक लॉकडाऊनबाबत एकमत; मुख्यमंत्री लवकरच करणार घोषणा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2Qibrav
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!