maharashtra

ऑक्सिजनसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला देखील तयार – राजेश टोपे

Share Now


मुंबई – देशभरातील अनेक राज्यातून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

काल नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचे प्राण गेल्याची घटना घडली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर थेट केंद्र सरकारला साकडे घातले आहे. सर्व प्रकारे अक्षरश: नम्र विनंती करायला राज्य सरकार तयार आहे, वेळ पडल्यास पाया पडायला देखील तयार आहे. राज्य सरकार राज्याच्या जनतेसाठी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे.

केंद्र सरकारकडे ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. आपल्याला ऑक्सिजनच्या संदर्भात ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावे लागणार आहे.

त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू असल्याचे राजेश टोपे यावेळी म्हणाले. सध्या आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

The post ऑक्सिजनसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला देखील तयार – राजेश टोपे appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3xdcPM9
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!