maharashtra

भारताला एकच अटीवर लसींचा पुरवठा करु; फायजर

Share Now


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून काल दिवसभरात देशात तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच मागील तीन महिन्यांपासून भारतामध्ये कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात निर्माण होणाऱ्या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. असे असतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या परिस्थिती फारशी समाधानकारक नसून चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केली आहे. भारताला लस देण्याची तयारी अमेरिकेतील फायजर कंपनीने दर्शवली असली तरी त्यासंदर्भात त्यांनी एक महत्वाची अट घातली आहे.

रशियन बनावटीच्या स्फुटनिक लसीच्या निर्मितीला परवानगी दिल्यानंतर आता भारताची नजर अमेरिकितील फायजर कंपनीच्या लसीकडे लागली आहे. त्यातच फायजरने आज भारतामध्ये लस देण्यासंदर्भात भाष्य करत लस देण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्यांनी यावेळी भारतात देण्यात येणाऱ्या लसी या केवळ सरकारी पुरवठा साखळीच्या माध्यमातून दिल्या जातील, असे स्पष्ट केले आहे.

म्हणजेच भारतामध्ये केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये बायोटेकच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या अमेरिकेतील फायजर ही लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून फायजर आपल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राधान्याने सरकारी यंत्रणेला लस पुरवठा करणार आहे. केवळ सरकारी कंत्राटाद्वारेच कंपनी भारतामध्ये कोरोना लसींचा पुरवठा करणार आहे.

भारताच सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे भारत सरकारकडून नियोजित दोन लसींसोबतच इतर पर्यायांचाही विचार केला जात असल्याच्या बातम्या समोर येत आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांना थेट परदेशी कंपन्यांकडून लस घेऊ देण्याची परवानगी देण्यासंदर्भातील विचार सुरु असल्याचे समजते. पण फायजरच्या लसीची किंमत ४० डॉलर म्हणजेच तीन हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. भारतामधील कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींची किंमत ३०० रुपयांपर्यंत असणार आहे.

भारताने लसीकरणाच्या बाबतीत चीन आणि अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांकांवर झेप घेतली आहे. भारतात मागील ९२ दिवसांमध्ये १२ कोटी २६ लाखांहून अधिक जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये एवढे लसीकरण करण्यासाठी ९७ तर चीनमध्ये १०८ दिवस लागले होते. उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील एक कोटींहून अधिक व्यक्तींना लस देण्यात आली आहे. दिवसाला सर्वाधिक लसी देणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

The post भारताला एकच अटीवर लसींचा पुरवठा करु; फायजर appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3sCy3zv
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!