maharashtra

सलमान खानच्या बहुप्रतिक्षित राधेचा ट्रेलर अखेर रिलीज

Share Now


बॉलीवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरने इंटरनेटवर धूमाकूळ घातला आहे. पण हा ट्रेलर एका किस सीनमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. नो ऑनस्क्रिन किसचा आपलाच नियम सलमान खानने या चित्रपटात मोडला आहे. चित्रपटात त्याने दिशा पटानीला किस केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

राधे फिल्ममध्ये सलमान खानसह अभिनेत्री दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटासाठी सलमाने त्याची ऑनस्क्रिन नो किस ही पॉलिसी तोडली आहे आणि अभिनेत्री दिशाला किस केले आहे. ट्रेलरमध्ये सलमान आणि दिशा एकमेकांना किस करत आहे, असा सिन आहे. त्यामुळे सलमानच्या ऑनस्क्रिन किसची फारच चर्चा रंगली आहे.

सलमानने आजवर कोणत्याही चित्रपटात ऑनस्क्रिन किस केले नव्हते. त्याने एका मुलाखतीत यावर भाष्य करत या चित्रपटासाठी किस महत्त्वाचे नसल्याचे म्हटले होते. पण आता सलमानने आपलाच नियम बदलल्याचे दिसत आहे. जगभरात सलमानचे लाखो चाहते असल्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरनंतर सलमानच्या या किसविषयी त्याचे चाहते मत व्यक्त करत आहेत.

येत्या ईदला म्हणजेच 13 मे 2021 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. तसेच झी फाय (Zee5) या प्लॅटफॉर्मच्या झी प्लेक्स (zee plex) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे. DTH ऑपरेटर म्हणजेच डिश टीव्ही, डी2एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल यावरही चित्रपट पाहता येणार आहे. यामुळे प्रेक्षकांना आपल्या घरातच सुरक्षितरित्या चित्रपट पाहता येणार आहे.

The post सलमान खानच्या बहुप्रतिक्षित राधेचा ट्रेलर अखेर रिलीज appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3v5Ww1K
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!