maharashtra

विरारमधील कोरोना रुग्णालयाच्या आयसीयुला भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

Share Now


वसई-विरार : नाशिकमध्ये नुकतीच ऑक्सिजन गळतीमुळे 24 कोरोनाबाधितांना आपला जीव गमावला लागल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील विरारमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. विरारमधील कोरोना रुग्णालयाच्या आयसीयूला भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

ही आग विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील आयसीयू विभागात लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आले आहे.

विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मध्यरात्री साडेतीन वाजता आग लागली. हे कोरोना रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण 39 रुग्ण उपचार घेत होते. प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमधील एसीचा स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली. त्यानंतर आयसीयूतील 4 रुग्ण आणि नर्सिंग स्टाफ बाहेर आले. तर सर्व नॉन कोविड रुग्ण सुखरुप असून त्यांना इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

घटनेविषयी बोलताना वसई-विरार महापालिकेच्या महापौरांनी बोलताना सांगितले की, महापालिकेच्या अग्निशमन दलाला मध्यरात्री 3 वाजून 13 मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आयसीयूमध्ये 17 रुग्ण होते. दुर्दैवाने त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एसीची स्फोट झाल्यामुळे आग लागली.

मृतांची नावे :

 1. उमा सुरेश कनगुटकर
 2. निलेश भोईर
 3. पुखराज वल्लभदास वैष्णव
 4. रजनी आर कडू
 5. नरेंद्र शंकर शिंदे
 6. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
 7. कुमार किशोर दोशी
 8. रमेश टी उपयान
 9. प्रविण शिवलाल गोडा
 10. अमेय राजेश राऊत
 11. रामा अण्णा म्हात्रे
 12. सुवर्णा एस पितळे
 13. सुप्रिया देशमुखे

The post विरारमधील कोरोना रुग्णालयाच्या आयसीयुला भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2QQT2kU
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!