maharashtra

कोरोनाविरोधातील लढाईसाठी राजस्थान रॉयल्सची ७.५ कोटींची मदत

Share Now


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात भयावह स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळावे म्हणून जगभरातील अनेक संस्थानी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. या संकटकाळात भारतात सुरू असलेल्या आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून ७.५ कोटी निधी जमा केला आहे. कोरोना रिलिफ फंडला हा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले.


हा निधी सर्व देशभर पसरलेल्या कोरोना महामारीमुळे पीडितांना तातडीने मदत मिळावी म्हणून जमा केल्याचे राजस्थान संघाने गुरुवारी सांगितले. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये भारतात लक्षणीय वाढ झाली असून बुधवारी देशात कोरोना प्रादुर्भावाची ३ लाख ७९ हजार २५७ प्रकरणे समोर आली आहेत. देशातील संक्रमितांची एकूण संख्या एक कोटी ८३ लाख ७६ हजारांवर पोहोचली आहे.

हा निधी संघ मालकांनी आणि संघ व्यवस्थापनाने खेळाडूंसोबत गोळा केला असून राजस्थान रॉयल्स फाऊंडेशन (आरआरएफ) आणि ब्रिटीश एशियन ट्रस्ट (बीएटी) च्या कल्याणकारी संस्थांसमवेत संघ कार्यरत असल्याचे फ्रेंचायझीने सांगितले.

The post कोरोनाविरोधातील लढाईसाठी राजस्थान रॉयल्सची ७.५ कोटींची मदत appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3u8K812
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!