maharashtra

हार्लेची पॅन अमेरिका १२५० अॅडव्हेंचर भारतीय बाजारात

Share Now

अमेरिकन ऑटो कंपनी हार्ले डेव्हिडसनने नुकतीच त्यांची बहुप्रतीक्षित लोकप्रिय पॅन अमेरिका १२५० अॅडव्हेंचर मोटरसायकल भारतीय बाजारात आणली आहे. दमदार इंजिन आणि मस्त लुक असलेली ही बाईक नवीन अवतारात भारतीय बाजारात आली आहे. या बाईकच्या निमित्ताने कंपनीने भारतात त्यांच्या दुसऱ्या खेळीची सुरवात केल्याचे मानले जात आहे.

ही बाईक दोन व्हेरीयंट मध्ये असली तरी दोन्हीचे इंजिन सारख्याच क्षमतेचे आहे. दोन्हीत फरक करण्यासाठी काही वेगळी फिचर्स दिली गेली आहेत. यात फुल एलईडी लाईट, ब्ल्यू टूथ इनेबल्ड ६.८ इंची कलर टीएफटी टच स्क्रीन डिस्प्ले, युएसबी सी टाईप आउटलेट ही फिचर्स दोन्ही मध्ये आहेत. टॉप व्हेरीयंट पॅन अमेरिका १२५० अॅडव्हेंचर मध्ये थोडी जास्त फिचर्स आहेत. प्रीमियम इलेक्ट्रोनिक्स ऑपरेटेड सेमी अॅक्टीव्ह सस्पेन्शन, सेंटर स्टँड, हिटेड ग्रिप्स, टायर प्रेशर मॉनीटर सिस्टीम अशी कार्स मध्ये असणारी फिचर आहेत.

ऑटो बाईकला अॅडॉप्टीव्ह राईट लाईट सिस्टीम हे फिचर प्रथम याच बाईकला दिले गेले असून टायर प्रेशर मॉनीटर हे प्रीमियम कार्स मध्ये दिले जाणारे फिचर या बाईकला दिले गेले आहे. यात पाच रायडिंग मोड आहेत.  दोन्ही बाईकसाठी १२५२ सीसी रीव्होल्युबल मॅक्स इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्स सह आहे. या बाईकची एक्स शो रूम किंमत १६.९० लाख रुपये असून टॉप मॉडेलची किंमत १९ लाख ९९ हजार आहे.

The post हार्लेची पॅन अमेरिका १२५० अॅडव्हेंचर भारतीय बाजारात appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3nww6nu
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!