maharashtra

घरच्याघरी तयार करा कीटकनाशके

Share Now


अनेकदा बागेतील फुलझाडांवरील पानांवर कीड आढळून येते. ही कीड झाडाची पाने फस्त करू लागते. अशा वेळी बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे आवश्यक ठरते. पण रासायनिक कीटकनाशके उपलब्ध नसल्यास घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून कीटकनाशके सहज तयार करता येऊ शकतात. सर्वसामान्यपणे प्रत्येक घरामध्ये भांडी धुण्यासाठी वापरला जाणारा लिक्विड डीश सोप असतोच. झाडांवरील कीड सहज नाहीशी होईल अशी तत्वे या लिक्विड सोपमध्ये असतात.

त्यामुळे घरच्याघरी कीटकनाशक तयार करण्यासाठी लिक्विड सोपचा वापर करण्याची पद्धत अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र या कीटकनाशकाचा वापर करताना हे केवळ झाडाच्या फांद्या आणि पानांवरच फवारले जाईल याची काळजी घ्यावी. हे कीटकनाशक थेट फळांवर किंवा भाज्यांवर फवारू नये. ही कीटकनाशक सुरुवातीला एखाद्याच झाडावर फवारून पाहावे. त्याचे काही दुष्परिणाम आढळले नाहीत तरच हे कीटकनाशक इतर झाडांच्या करिता वापरावे. हे कीटकनाशक तयार करण्यासाठी अडीच कप पाण्यामध्ये अर्धा कप स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तेल, आणि पाऊण चमचा लिक्विड सोप मिसळावा. हे मिश्रण चांगले एकजीव करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरावे आणि झाडांवर फवारावे.

कीटकनाशक तयार करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे तीन कप पाण्यामध्ये एक मोठा चमचा बेबी शँपू घालावा. याही मिश्रणाचा वापर कीटकनाशक म्हणून करता येतो. बेबी शँपू हा तान्ह्या मुलांची नाजूक त्वचा लक्षात घेऊन तयार केला जात असल्याने यामध्ये अतितीव्र रसायने नसतात. त्यामुळे याचा वापर झाडांसाठी हानिकारक ठरण्याची शक्यात खूपच कमी असते. विशेषतः घराच्या आतमध्ये असलेल्या फुलझाडांवर असलेल्या किडीवर याचा वापर उत्तम ठरतो. बारीक चिरलेला अर्धा कांदा, लसुणाच्या पाच पाकळ्या, अर्धा चमचा देगी मिरची पावडर, आणि तीन कप उकळते पाणी एकत्र करून हे मिश्रण एक तासभर झाकून ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण गाळून घेऊन हे पाणी कीटकनाशक म्हणून वापरावे.

The post घरच्याघरी तयार करा कीटकनाशके appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/332s3pw
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!