maharashtra

या समाजात लग्न करण्यासाठी चोरावी लागते दुसऱ्याची बायको

Share Now


जगभरात लग्नाच्या बाबतीत ज्याच्या त्याच्या आपल्या प्रथा-रितीरिवाज आहेत. त्यातच आपल्या देशात लग्नापद्धतीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पण आम्ही आज तुम्हाला एका देशातील समाजात सुरु असलेल्या अशाच रितीरिवाजाबाबत सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही अवाक् होणार एवढे मात्र नक्की…

या समाजातील प्रथेसंदर्भातील वृत्त डेली मेलने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एक असा समाज पश्चिम आफ्रिकेत आहे जिथे लग्न करण्यासाठी दुसऱ्याची पत्नी चोरावी लागते. या प्रथेमुळे एकमेकांच्या पत्नी चोरुन तेथील लोक लग्न करतात. आणखी काही या अनोख्या रिवाजाबाबत जाणून घेऊ.

एकमेकांच्या पत्नींना चोरुन आणून पश्चिम आफ्रिकेच्या वोदाब्बे जमातीत लोक लग्न करतात. या जमातीच्या लोकांची अशाप्रकारचे लग्न ओळख आहे. या लोकांमध्ये ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. या प्रथेसंदर्भात असे सांगितले जाते की, कुटुंबातील लोकांच्या या समाजातील लोकांचे पहिले लग्न सहमतीने केले जाते. पण दुसरे लग्न करायचा रिवाज फारच वेगळा आहे. दुसऱ्या लग्नासाठी या समाजात दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरुन आणणे गरजेचे आहे. जर असे करु शकत नसाल तर तुम्हाला दुसरे लग्न करण्याचा अधिकार मिळत नाही.

दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचे या समाजातील लोकांमध्ये आयोजन केले जाते. मुले या आयोजनादरम्यान साज करुन चेहऱ्यावर रंग लावून असतात. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डान्स आणि वेगवेगळ्या गोष्टी करुन दुसऱ्यांच्या पत्नींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. पण यादरम्यान काळजी घ्यावी लागते की, त्या महिलेच्या पतीला याची माहिती होऊ नये. त्यानंतर जर एखादी महिला दुसऱ्या पुरुषासोबत पळून जात असेल तर तेव्हा या समुदायातील लोक दोघांना शोधून त्यांचे लग्न लावून देतात. या दुसऱ्या लग्नाला लव्ह मॅरेज म्हणूण स्विकारले जाते.

The post या समाजात लग्न करण्यासाठी चोरावी लागते दुसऱ्याची बायको appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3e5xgDt
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!