maharashtra

‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचे निधन

Share Now


नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मेरठमधील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना बागपत येथील रहिवासी असलेल्या ज्येष्ठ नेमबाज दादी चंद्रो तोमर यांचे निधन झाले. त्यांना एका दिवस आधी आनंद हॉस्पिटलमधून मेरठच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ नेमबाज दादी चंद्रो तोमर याच्या मृत्यू कारण ब्रेन हेम्ब्रेज असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, बॉलिवूड कलाकारांनी दादी चंद्रो यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

याबाबत माहिती देताना नेमबाज दादी चंद्रो तोमर यांचा मुलगा विनोद तोमर म्हणाला की, सोमवारी तिला श्वास घेण्यात त्रास झाल्यानंतर चाचणी केली असता तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांना मेरठच्या आनंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रात्री प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. चंद्रो तोमर यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या पाहून त्यांचे चाहते निराश झाले होते. लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा देत होते. पण, शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.

चंद्रो तोमर यांनी वयाच्या 60 व्या वर्षी शूटिंगमध्ये करिअर केले असून बऱ्याच राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांच्यावर एक चित्रपटही तयार करण्यात आला होता. चंद्रो तोमर यांना जगातील सर्वात वयस्क नेमबाज मानले जात होते.

The post ‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचे निधन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3h3YX1p
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!