maharashtra

कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेदरम्यान पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना सूचना

Share Now


नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट देशभरात झपाट्याने पसरत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अनेक कोरोनाबाधितांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर मंत्री मंत्रीमंडळाची ही पहिली बैठक आहे. यावेळी, सद्यस्थिती बिकट असून यामुळे जगावर एक मोठे संकट उभे राहिले असल्याचे मंत्रिमंडळाने मान्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले की, सरकारची सर्व शस्त्रे एकजूट होऊन वेगवान काम करीत आहेत, जेणेकरून परिस्थितीला सामोरे जाता येईल. त्यांनी सर्व मंत्र्यांना आपापल्या भागातील लोकांशी सतत संपर्कात रहावे, मदत करावी आणि मग त्यांचा अभिप्राय घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत.

स्थानिक पातळीवर समस्या ओळखून त्यावर त्वरित तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. याबरोबरच, मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या 14 महिन्यांतील देशातील जनतेसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारांना रुग्णालयात बेड वाढवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे. पीएसए ऑक्सिजनची सुविधा आणि उत्पादन व वाहतुकीतून आवश्यक औषधांची उपलब्धता याबद्दल केंद्राच्या मदतीबद्दल माहिती देण्यात आली. याव्यतिरिक्त, त्याचा पुरवठा आणि उपलब्धता वाढविण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हेदेखील या बैठकीत अधोरेखित केले गेले.

The post कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेदरम्यान पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना सूचना appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3vxjKhD
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!