maharashtra

सीएम केअर फंडला राष्ट्रवादीचे आमदार-खासदार देणार एका महिन्याचे वेतन

Share Now


मुंबई – काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सकाळीच आपले वर्षभराचे वेतन करोनाविरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यापाठोपाठ काँग्रेसचे सर्व आमदार एका महिन्याचे वेतन देणार असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर आता त्याच स्वरूपाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने देखील घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सर्व आमदार आणि खासदार आपला एका महिन्याचा पगार मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १ कोटी रुपयांची स्वतंत्र मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वत: नोट लिहून यासंदर्भात पक्षाला सूचना केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात एक चिठ्ठी लिहून पक्षाला त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. आमदार-खासदारांचे एक महिन्याचं वेतन कोरोना संदर्भात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी, राज्यातील आरोग्य सेवा, पोलीस दल, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आपल्या पक्षामार्फत द्यावे. तसेच, आपल्या पक्षामार्फत एक कोटी रुपये राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे देण्यात यावेत. श्री टकले व्यवस्था करतील, अशी नोट शरद पवार यांनी दिली होती.

त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाकडून १ कोटी रुपयांच्या निधीचा चेक देण्यात आला असून तसेच आमदार-खासदार आपले महिन्याभराचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देतील, असे परिपत्रक देखील पक्षाकडून काढण्यात आले आहे.

The post सीएम केअर फंडला राष्ट्रवादीचे आमदार-खासदार देणार एका महिन्याचे वेतन appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3aS4BQ6
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!