maharashtra

‘वर्क फ्रॉम होम’मुळे गुगलचे वर्षभरात वाचले ७४०० कोटी रुपये

Share Now


नवी दिल्लीः जगभरात गेल्या वर्षी कोरोना महामारी आल्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक कंपनीने वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. वर्ष लोटले असले तरी अजूनही अनेक कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. आता अनेकांसाठी वर्क फ्रॉम होम नॉर्मल झाले आहे. वर्क फ्रॉम होममुळे कर्मचाऱ्यांना काही गोष्टींचा त्रास होत असला तरी कंपन्यांना मात्र फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

सर्वात आधी जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter ने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. १ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४०० कोटी रुपये गुगलने वर्क फ्रॉम होममुळे वाचवले आहेत.

गुगलचे महामारीमुळे कर्मचारी वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम करीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने प्रमोशन आणि इंटरनटेमेंटचा खर्च कमी केला. त्यातून कंपनीला २६८ मिलियन डॉलर म्हणजेच १९८० कोटी रुपये वाचवता आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त कोरोनामुळे हे शक्य झाले आहे. जर दरवर्षी खर्चाचा एकूण विचार केला तर १ बिलियन डॉलर म्हणजेच ७ हजार ४०० कोटी रुपये अधिक कंपनी खर्च करीत असते. त्यामुळे वर्षभरात कंपनीला काहीच करावे लागले नसल्यामुळे हा संपूर्ण पैसा कंपनीचा वाचला आहे.

अनेक सेक्टरला कोरोना महामारीमुळे फटका बसला आहे, हे आपण अनेकदा वाचले, ऐकले आहे. पण या दरम्यान इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणजे गुगलला अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळाले. गुगलचा रेवेन्यू जवळपास ३४ टक्के वाचला आहे.

या वर्षीच्या अखेरला कंपनी ऑफिसमध्ये काम सुरू करण्याची प्लानिंग करीत आहे. चीफ फायनान्शियल ऑफिसर रुथ पोराटने गुंतवणूकदारांना सांगितले की, कंपनी हायब्रिड मॉडलवर लोकांना ऑफिसला बोलावण्याची योजना बनवीत आहे. ज्यात ऑफिस येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत कमी असणार आहे.

The post ‘वर्क फ्रॉम होम’मुळे गुगलचे वर्षभरात वाचले ७४०० कोटी रुपये appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2R7ymp3
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!