maharashtra

पूजेसाठी बसताना आसनाचे असे आहे महत्व.

Share Now


धार्मिक कार्ये करताना किंवा नित्यपठन, जप करताना बसण्यासाठी आसनाचा वापर करण्याची परंपरा वैदिक काळापासून रूढ आहे. पूजापाठ, धार्मिक कार्ये घरामध्ये असोत, किंवा एखाद्या मंदिरामध्ये असोत, जमिनीवर बसून पूजा करायची असल्यास आसानाचा वापर करणे अगत्याचे मानले गेले आहे. धर्मशास्त्रांमध्ये प्रत्येक कार्याकरिता निरनिराळ्या आसनांचा उपयोग सांगितला गेला आहे. पण नित्याच्या पूजेच्या वेळी आसन कसे असावे, याची माहिती फारशी सर्वश्रुत नाही. पूजेसाठी आसन असणे आवश्यक आहे किंवा नाही, आसन कसे असावे, इत्यादी सर्व बाबी जाणून घेऊ या.

धर्मशास्त्रांच्या अनुसार जपाला बसताना नेहमी आसन असणे आवश्यक आहे. आसनाविना केवळ जमिनीवर बसून जप केल्याने दुःख प्राप्ती होत असल्याचे म्हटले जाते. तसेच पूजेसाठी जे आसन अंथरले जाते, ते बांबूचे नसावे (चटई). बांबूचे आसन दारिद्र्याला कारणीभूत ठरत असल्याची मान्यता आहे. त्याचप्रमाणे दगडी फरशीवर किंवा दगडावर बसून पूजापाठ करू नये. दगडी फरशीवर किंवा दगडावर बसून पूजा केल्याने त्याची योग्य फलप्राप्ती होत नसल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे लाकडी आसनावर बसून पूजापाठ करणेही अशुभ फलदायी मानले गेले आहे. तसेच गवतापासून तयार केलेल्या आसनावर बसून पूजा केल्याने यश आणि कीर्ती नष्ट होत असल्याचे म्हटले जाते. पर्णींपासून, म्हणजेच पानांपासून तयार केल्या गेलेल्या आसनावर बसून पूजा केल्याने चित्त विचलित रहात असल्याचे म्हटले जाते.

शास्त्रांमध्ये आसने कशा प्रकारची असू नयेत हे ज्याप्रमाणे सांगितले गेले आहे, त्याचप्रमाणे पूजा करताना आसन कसे असावे हे देखील सांगितले गेले आहे. घरामधील कोणत्याही शुभकार्यासाठी आसन वापरताना ते रेशमी, लोकरीचे बनलेले, मृगचर्म, काष्ठ किंवा तालपत्राचे असावे. तसेच श्राद्धकर्म विधींसाठी आसन वापरताना शमी, श्रीपर्णी, कदंब, खेर इत्यादींपासून तयार केलेल्या आसनांचा वापर सांगितला गेला आहे. कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करण्यासाठी केल्या गेलेल्या जप-तपासाठी व्याघ्रचर्म वापरण्याची पद्धत प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होती, तर ज्ञानप्राप्तीसाठी मृगचर्म वापरले जात असे. सुती वस्त्राचे साधे स्वच्छ आसन रोगमुक्ती देणारे असल्याने नित्याच्या पूजेसाठी हे आसन उत्तम समजले गेले आहे.

The post पूजेसाठी बसताना आसनाचे असे आहे महत्व. appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3eOMlbq
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!