maharashtra

अदर पुनावाला म्हणतात; ‘मी लवकरच पुन्हा येईन’

Share Now


नवी दिल्ली – सध्या लंडनमध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला हे असून आपण लवकरच भारतात परतणार असल्याचे त्यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदर पुनावाला यांनी धमकवणारे फोन येत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सध्याच्या परिस्थितीत कोणाला जबाबदार ठरवता येईल, मी यासंदर्भात कोणाचे नाव घेतले तर माझा शिरच्छेद केला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.


ब्रिटनमध्ये कंपनीचे भागिदार आणि स्टेकहोल्डर्स यांच्यासोबत बैठक पार पडली. बैठक चांगल्या पद्धतीने झाली. कोव्हिशिल्डचे उत्पादन पुण्यात जोरात सुरु आहे. काही दिवसात मी परत आल्यानंतर लस उत्पादनाची समीक्षा करेन, असे ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.

सध्या कुटुंबासोबत अदर पूनावाला हे ब्रिटनमध्ये आहेत. त्यांनी ही मुलाखत तिथेच दिली होती. या दबावाबद्दलची माहिती या मुलाखतीत दिली, तसेच सीरम इन्स्टिट्यूट आता देशाबाहेर लस निर्मितीचा प्लॅन्ट सुरू करण्याचेही नियोजन करत असल्याचेही, ते म्हणाले होते. भारत सरकारने सीरमच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या दोन लसींना मान्यता दिली आहे. पण देशात आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण हे अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्युटने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे झाले आहे.

The post अदर पुनावाला म्हणतात; ‘मी लवकरच पुन्हा येईन’ appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3t6amjz
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!