maharashtra

सापाच्या विषापेक्षाही विषारी हे झाड !

Share Now


आपल्या घराच्या आसपास हिरवळ असावी, घनदाट छाया देणारे वृक्ष असावेत असे सर्वांनाच वाटत असते. यासाठी अनेक जण अतिशय हौशीने आपल्या घराच्या आसपास बगीचा फुलवत असतात. घराभोवती झाडे असणे हे केवळ आपल्या दृष्टीने नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही हितकारक असते. झाडांचे आपल्या आयुष्यातील महत्व मोठे आहे. फळे, फुले, सावली, प्राणवायू पासून इंधन, कागद, फर्निचर बनविण्यासाठी लाकूड पुरविणारे अतिशय बहुपयोगी असे हे वृक्ष असतात. मात्र जगामध्ये काही वृक्ष असे ही आहेत, जे प्राणीमात्रांसाठी प्राणघातक ठरू शकतात.

अशाच झाडांपैकी एक प्रजाती इंग्लंड मध्ये पाहिली जात असून, या झाडाच्या प्रजातीला ‘हॉगविज’ किंवा ‘किलर ट्री’ या नावाने ओळखले जाते. या प्रजातीला वनस्पतीशास्त्रामध्ये ‘हेरकिलम मेंटागेजिएनम’ या नावाने ओळखले जाते. झाडांची ही प्रजाती ब्रिटनमधील लँकशर प्रांतामध्ये पहावयास मिळते. हे झाड अतिशय विषारी असून, सर्वसाधारणपणे चौदा फुटांपर्यंत या झाडाची उंची वाढते. या झाडाला चुकून जरी एखाद्याचा स्पर्श झाला, तर त्या व्यक्तीच्या हातांवर त्वरित भाजल्याप्रमाणे फोड येऊ लागतात.

या झाडाला स्पर्श झाल्यानंतर दोन दिवसांनी याचे परिणाम पहावयास मिळत असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात. हे झाड दिसावयास अतिशय आकर्षक असले, तरी हे अतिशय घातक ठरू शकते. किंबहुना हे झाड इतके विषारी आहे, की एखाद्या सापाच्या विषा पेक्षाही घातक या झाडाचे विष असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. एखाद्याने या झाडाला चुकून जरी स्पर्श केला, तरी यातील विषाच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगाची काही वेळातच असह्य लाही लाही होऊ लागत असल्याचे पहिले गेले आहे. इतकेच नव्हे तर या झाडाच्या विषाच्या प्रभावाने मनुष्याची दृष्टी जाण्याचा ही धोका उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. या झाडाच्या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी आजतागायत कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नसल्याचे समजते. या झाडामध्ये असलेल्या एका विशिष्ट रसायनामुळे हे झाड विषारी बनले असल्याचे वैज्ञानिक म्हणतात.

The post सापाच्या विषापेक्षाही विषारी हे झाड ! appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3e807XF
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!