maharashtra

भाजपचे सुवेंदू अधिकारी यांना लोळवत ममता बॅनर्जींचा विजय

Share Now


नंदींग्राम – तृणमूल काँग्रेसने संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. २०० हून अधिक जागा मिळवत तृणमूल काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर दुसरीकडे कडवे आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपच्या हाती मोठी निराशा आली आहे. भाजपची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे.

निवडणुकीच्या अधिकृत निकालाची अद्याप घोषणा झालेली नाही, पण ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.

सकाळी ८ वाजता पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली, कोरोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. एकीकडे कोरोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झाले. गेल्या १० वर्षांपासून ममता बॅनर्जी सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.

भाजपने ममता बॅनर्जी यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण केले होते. मैदानात उतरुन स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रचार केला. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरे जावे लागले.

The post भाजपचे सुवेंदू अधिकारी यांना लोळवत ममता बॅनर्जींचा विजय appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3t8E9rH
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!