maharashtra

३ मे पासून सात दिवसांसाठी हरयाणात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा

Share Now


हरयाणा – कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या देशात अतिशय वेगाने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज लाखोंनी वाढ होत आहे. आता काही राज्यांमध्ये या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाउन घोषित केला जात आहे, तर काही ठिकाणी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येत आहे. याच दरम्यान हरयाणा सरकारने ३ मे पासून सात दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउन घोषित केला आहे. याबाबतची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी केली आहे.

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये या अगोदर शुक्रवारीच वीकेंड लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. आता संपूर्ण राज्यात सात दिवस कडक लॉकडाउन असणार आहे. हरयाणात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढलेला आहे. राज्यात शनिवारी १२५ कोरनाबाधितांचा मृत्यू देखील झाला आहे.

The post ३ मे पासून सात दिवसांसाठी हरयाणात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3gX66QS
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!