maharashtra

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठ्याचे योग्य नियोजन सुरू – डॉ. राजेंद्र शिंगणे

Share Now


मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिविरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात उत्पादित होणारा आणि इतर राज्यातून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील जिल्ह्यांना सुरळीत आणि आवश्यकतेनुसार प्राप्त व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे (एफडीए) राज्यातील ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठ्याबाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात आले आहे.

एफडीएमार्फत उत्पादकांना 2 मे रोजी 1695 मे.टन ऑक्सीजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्रातून सूचना दिल्या गेल्या आहेत. 30 एप्रिल रोजी 1608 टन द्रवरूप वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेला असून, 1 मे रोजी 1674 टन ऑक्सिजनच्या वितरणाबाबतची माहिती उत्पादकांनी प्रस्तावित वितरण पत्रावरून दिली आहे.अन्न व औषध प्रशासन व शासनाव्दारे या कामी नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्याद्वारा (नोडल अधिकारी) राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत सर्वोपरीने प्रयत्न केले जात आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी 21 एप्रिल 2021 ते 09 मे 2021 या कालावधीसाठी एकूण 8,09,000 एवढा कोटा मंजूर केलेला असून, येत्या काही दिवसात राज्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन अधिक उपलब्ध होणार आहे.

रेमडेसिविर या इंजेक्शनाचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या सात औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. या औषधाचा पुरवठा प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून करण्यात येतो.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या सात कंपन्यांना महाराष्ट्र राज्यासाठी 4,73,500 रेमडेसिविरचा साठा दिनांक 21 एप्रिल 2021 ते 02 मे 2021 या कालावधीत उपलब्ध करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि. 30 एप्रिलपर्यंत 3,44,494 इतका साठा शासकीय व खाजगी रुग्णालयांना वितर‍ित झाला आहे,अशी माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

The post राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठ्याचे योग्य नियोजन सुरू – डॉ. राजेंद्र शिंगणे appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3nHgOMB
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!