maharashtra

राज ठाकरेंचे आभार मानत एम.के. स्टॅलिन यांनी दिली भाषिक समता जपण्याची ग्वाही

Share Now


मुंबई – तमिळनाडूमध्ये गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव करीत एम के. स्टॅलिन यांच्या द्रमुकने पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. एम के. स्टॅलिन यांना या विजयाबद्दल अनेक राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

तामिळनाडूत द्रमुकचा विजय स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ट्विटरद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही काल शुभेच्छा दिल्या होत्या आणि करुणानिधींनी कायमच भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला प्राधान्य दिले, त्याचप्रमाणे तुम्हीही प्राधान्य द्याल आणि राज्यांच्या स्वायत्तेबद्दल आग्रही रहाल, अशी आशा राज ठाकरे यांनी स्टॅलिन यांना शुभेच्छा देताना व्यक्त केली होती. त्यावर स्टॅलिन यांनीही आता राज ठाकरेंचे आभार मानले असून त्यांना एक ग्वाही दिली आहे.


राज ठाकरे यांनी स्टॅलिन यांना शुभेच्छा देताना स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयासाठी स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिले, तुम्ही देखील हिच भूमिका तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्तेबद्दल आग्रही रहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन, असे म्हटले होते. स्टॅलिन यांनी त्यावर, राज ठाकरे… तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे…हो, माझ्याकडून भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांच्या स्वायत्ततेला प्राधान्य देणे सुरूच राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

The post राज ठाकरेंचे आभार मानत एम.के. स्टॅलिन यांनी दिली भाषिक समता जपण्याची ग्वाही appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/337mRkn
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!