maharashtra

आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती; ‘या’ नंबरवर करा फक्त एक मेसेज

Share Now


एकीकडे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दुसरीकडे लसीकरण मोहिमेंदेखील वेग घेतला आहे. जर आपल्यापैकी अजूनही कोणी कोरोनाची लस घेतली नसेल, तर आता तुम्ही घरबसल्या जवळच्या कोरोना लसीकरण केंद्राबाबतची माहिती चुटकीसरशी मिळवू शकतो. आता तुम्ही फेसबुकच्या इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर चॅटिंग करुनही जवळच्या लसीकरण केंद्राबाबतची सविस्तर माहिती मिळवू शकणार आहात. पण ही मिळवणार कशी याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत… चला तर मग जाणून घेऊया काय आहे प्रक्रिया?


या फिचरबाबतची माहिती ट्विटरद्वारे MyGov इंडियाच्या कोरोना हेल्पडेस्कने दिली आहे. त्यानुसार तुम्ही आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही तुमच्या जवळील लसीकरण केंद्राबाबतची माहिती मिळवू शकतात. गेल्या वर्षी MyGov Corona Helpdesk चॅटबॉट लाँच झाला असून याला हिंदी आणि इंग्रजी भाषेचा सपोर्ट आहे. आता आपण टप्प्याने टप्प्याने जाणून घेऊया व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लसीकरण केंद्राबाबतची कशी मिळेल माहिती :

  • कोरोना लसीकरण केंद्राबाबतची माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये +91-9013151515 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल.
  • नंतर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करुन सेव्ह केलेल्या त्या क्रमांकावर Namaste असा मेसेज पाठवा.
  • नंतर ९ पर्यायांचा एक रिप्लाय येईल.
  • त्यापैकी तुम्हाला 1 लसीकरणाबाबतच्या माहितीसाठी लिहून पाठवावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय मिळतील. यापैकी केंद्राबाबतच्या माहितीसाठी पुन्हा 1 लिहून पाठवावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचा पिन कोड विचारला जाईल, पिन कोड पाठवताच तुमच्या जवळ असलेल्या सर्व लसीकरण केंद्राबाबतची माहिती मिळेल.

The post आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती; ‘या’ नंबरवर करा फक्त एक मेसेज appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3nK63cz
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!