maharashtra

शिक्कामोर्तब! ५ मे रोजी घेणार ममता बॅनर्जी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Share Now


कोलकाता – अखेर तृणमूल काँग्रेसने अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत बाजी मारली. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवला. तृणमूलने अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, सर्व आमदारांची शपथविधी ६ मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली, यामध्ये हा निर्णय झाला आहे.

कोणताही मोठा समारोह शपथविधी प्रसंगी होणार नाही, हा शपथविधी राज्यपाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या सर्वांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी वेळ असणार आहे. तसेच, ममता बॅनर्जींनी सर्व आमदार, नेते व कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की, कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नये अथवा जल्लोष करू नये, असे आवाहन ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्यांना केले आहे.

The post शिक्कामोर्तब! ५ मे रोजी घेणार ममता बॅनर्जी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3nGHXPK
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!