maharashtra

४ महिने पुढे ढकलली NEET-PG परीक्षा; आता इंटर्नशीप करणारे डॉक्टरही करणार कोरोनाबाधितांची सेवा

Share Now


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात थैमान घातले असल्यामुळे अशावेळी मनुष्यबळाचीही कमतरता भासू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यामुळेच हे मनुष्यबळ वाढवण्यासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

४ महिने पुढे नीट(NEET-PG) ही परीक्षा ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या एक महिना अगोदर नवी तारीख जाहीर केली जाईल. त्याचबरोबर आता कोरोनाबाधितांची सेवा इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनाही करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे इंटर्न्स आपल्या वरिष्ठांसोबत राहून कोरोनाबाधितांवर उपचार करतील. फोनच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तसेच सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या डॉक्टर्सची मदत घेतली जाणार आहे. यामुळे आत्ता सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांवरचा कामाचा ताण कमी व्हायला मदत होणार आहे.

दरम्यान निवासी डॉक्टर्स म्हणून पदव्युत्तर शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीही काम करु शकणार आहेत. त्याचबरोबर बीएससी किंवा जीएनएम हे शिक्षण घेतलेल्या नर्सना देखील कोरोना काळात वरिष्ठांच्या हाताखाली काम करण्यासाठी नेमण्यात येणार आहे.

कोरोना काळात ड्युटीचे कमीतकमी १०० दिवस पूर्ण केल्यानंतर काम केलेले हे वैद्यकीय कर्मचारी शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी पात्र ठरणार आहे. त्यांना शासकीय सेवेत प्राधान्य देण्यात येणार आहे.

कोरोना काळात काम केलेल्या या कर्मचाऱ्यांचे लसीकऱण करण्यात येईल तसेच भारत सरकारच्या आरोग्य सेवकांसाठीच्या इन्शुरन्स योजनेचाही लाभ घेता येईल. कमीत कमी १०० दिवस ड्युटी केल्यानंतर अशा सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारत सरकारकडून सन्मानित कऱण्यात येणार आहे.

The post ४ महिने पुढे ढकलली NEET-PG परीक्षा; आता इंटर्नशीप करणारे डॉक्टरही करणार कोरोनाबाधितांची सेवा appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/2QRzXzp
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!