maharashtra

यशराज फिल्म्सच्या वतीने करण्यात येणार 30 हजार लोकांचे मोफत लसीकरण

Share Now


मुंबई : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या आणि पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला. अशातच मजूर, तंत्रज्ञ आणि लहान कलाकारांचे यशराज फिल्मसच्या यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. इंडस्ट्रीतील एकूण 30,000 लोकाचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय यशराज फिल्म्सने घेतला आहे. एवढेच नाहीतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांनी हाती घेतलेल्या उपक्रमासाठी लागणारे लसींचे डोस उपलब्ध करुन देण्याचे आवाहन यशराज फिल्मच्या वतीने करण्यात आले आहे.

‘द यश चोपड़ा फाउंडेशन’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये इंडस्ट्रीमधील 30 हजार कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीचे डोस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. तसेच ज्या 30,000 कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने मोफत लस देण्यात येणार आहे, त्यांच्या लसीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा सर्व खर्च यश चोप्रा फाउंडेशन करणार असल्याचे देखील या पत्रात लिहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यशराज फिल्मच्या वतीनं लिहिण्यात आलेल्या या पत्राव्यतिरिक्त फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज ‌(FWICE) ने देखील या आशयाचे पत्र लिहिले आहे आणि लवकरात लवकर इंडस्ट्रीमधील कर्मचाऱ्यांसाठी लस उपलब्ध करुन देण्याचे आणि एक वेगळे लसीकरण केंद्र देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, यशराज फिल्म्सच्या वतीने घेण्यात आलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांना केवळ एकच नाहीतर दोन लसीचे डोस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तर फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेडरेशन आणि यशराज फिल्म्सच्या मागणी लवकरात लवकर मान्य करतील, आम्हाला आशा आहे. जेणेकरुन लसीकरणाचे हे अभियान लवकराच लवकर सुरु होण्यास मदत होईल. आमचे सगळे कर्मचारी कोरोना संकटासोबतच भूकेच्या संकटाशीही लढा देत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी लवकरात लवकर लसीकरण अभियान सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे.

The post यशराज फिल्म्सच्या वतीने करण्यात येणार 30 हजार लोकांचे मोफत लसीकरण appeared first on Majha Paper.

from Majha Paper https://ift.tt/3tfBLzl
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!