💉 भारतामध्ये कोरोनाचे लसीकरण अगदी टप्प्यात असताना, आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
😱 ब्रिटनमधून जी विमाने आली त्यामध्ये 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले.
➡️ दिल्लीमध्ये हा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तातडीने मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावून काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
📍युरोपियन, आखाती देशांमधून येणार्या प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक विलागिकरण करण्याचे सक्तीचे आदेश हे महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. तर, पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी बारा हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
😷 कोरोना पार्श्वभूमीवर विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना टेस्ट करून घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.
🎯 महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात हे आदेश 22 डिसेंबर पासून लागू करण्यात आले.
😓 कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिक खबरदारी घेण्यात येत असून, पुढील पंधरा दिवस जास्त सतर्क रहावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
सविस्तर माहिती साठी बघा https://spreaditnow.in/?r=021×9
Add Comment