महाराष्ट्र

शिक्षण मंडळ म्हणते शाळेतून दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरा; मात्र कोरोनाने बंद शाळांबाबत शिक्षकांत नाराजी!

Share Now

💉 कोरोना व्हायरस आणि वाढता प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जवळजवळ सात ते आठ महिने लॉक डाऊन मध्ये काढावे लागले. याचा सगळ्यात मोठा फटका हा शिक्षण विभागाला बसला आहे.

📚 अभ्यासक्रम आणि विद्यार्थी दोन्ही देखील अधांतरी असणाऱ्या भविष्याकडे बघताना आज आपल्याला पाहायला मिळतात.

🎒शाळेची पिशवी पाठीवरून उतरली असली तरीदेखील भविष्याची चिंता पालकांना आणि पाल्यांना नक्कीच सतावत आहे.

🧑🏻‍💻 ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाला सुरुवात झाली आहे. परंतु, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या वळणावर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

➡️ डिसेंबर चा शेवटचा आठवडा आहे. दहावीच्या परीक्षा मार्चमध्ये सहसा सुरू होतात. याच अंतिम परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.

🏫 शाळेतूनच अर्ज भरून घेण्याच्या सूचना देखील शिक्षण मंडळाकडून शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.

🎯 मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने हि प्रक्रिया कशी राबवणार याबाबत मुख्याध्यापक वर्गात नाराजी पाहायला मिळत आहे. शाळा उघडण्याबाबत संभ्रम असल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

📍मुंबईसह महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी अजूनही शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे दहावीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध मदतीसाठी शिक्षक कसे उपलब्ध होणार आणि शिक्षण मंडळाकडून कोणत्याही पद्धतीच्या अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या गेल्या नसल्याने, शिक्षकांमध्ये देखील संभ्रम असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर माहिती साठी बघा https://spreaditnow.in/?r=021×9


Share Now
error: Content is protected !!