महाराष्ट्र

प्राचीन काळामध्ये राजे-महाराजांचे असे ही चित्रविचित्र समज-गैरसमज

Share Now

royal
प्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या राजा-महाराजांच्या शौर्याच्या अनेक विजयी गाथा आपण ऐकत आलो आहोत. तसेच त्यांची जीवनशैली कशी होती, किंवा त्यांच्या काळी असलेली समाजरचना, चाली रीती, परंपरा यांच्या विषयी माहिती देणारी अनेक पुस्तके, माहितीपट, लेख अस्तित्वात आहेत. पण या राजा-महाराजांमध्ये अश्याही राज्यकर्त्यांचा समावेश आहे, जे पराक्रमी होते, पण त्यांच्या मनामध्ये काही समज-गैरसमज अगदी पक्के रुजले असल्याने ते काहीसे विक्षिप्त बनले होते. त्यामुळे त्यांच्या आसपासच्या लोकांना त्यांचे वर्तन विचित्र न वाटते तरच नवल होते.
royal1
फ्रान्सचा राजा चौथा चार्ल्स याला, तो काचेने बनला असल्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळे इतरांना भेटण्यास जात असताना कोणाचा धक्का लागून आपण ‘फुटून’ जाऊ नये यासाठी चार्ल्स आपल्या कपड्यांमध्ये लोखंडाचे पातळ रॉड, सुरक्षेच्या दृष्टीने शिवून घेत असे. चार्ल्स स्वतःला परमेश्वराचा अवतारही समजत असे. त्याच्या अश्या या विचित्र समजुतींमुळे इतिहासामध्ये त्याचा उल्लेख ‘चार्ल्स द मॅड’, म्हणजेच ‘वेडा चार्ल्स’ असा ही केला जातो. त्याच्या डोक्यावर झालेला हा परिणाम अनुवांशिक असून, त्याच्या आईकडून त्याला हे ‘जीन्स’ आल्याचे तत्कालीन तज्ञांचे म्हणणे होते. चार्ल्सने फ्रान्सवर ४२ वर्षे राज्य केले. तो वीस वर्षांचा असताना त्याचे मानसिक संतुलन ढळू लागले होते. त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर चार्ल्स ‘सायकोसीस’ ने त्रस्त राहिला. काही काळाने त्याला आपल्या जवळच्या व्यक्तींची ओळखही पटेनाशी झाली. तो अचानक त्याच्या महालामधून उठून इतस्ततः धावू लागत असल्याने महालाभोवती मोठी भिंत उभारली गेली होती.
royal2
रोमन सम्राट कालिगुला याचा त्याच्या ‘इन्सीटाटस’ नामक घोड्यावर खूपच जीव होता. पण हे प्रेम वाढता वाढता इतके वाढले, की त्याने आपल्या घोड्याला ओट्स बरोबर सोने देखील खाऊ घालण्यास सुरुवात केली. तसेच आपल्या घोड्याला राजदूत म्हणून नियुक्त करण्याचा देखील निर्णय कालिगुलाने घेतला. त्याने आपल्या घोड्याची नियुक्ती ‘प्रीस्ट’ म्हणून केली, आणि त्याच्यासाठी आलिशान घर देखील बनवविले. इतर राजदूतांशी अपमानजनक वर्तन करीत आपला घोडा त्यांच्यापेक्षा उत्तम राजदूत होऊ शकतो असे कालिगुलाने आपल्या इतर राजदूतांना ठणकावून सांगितले, आणि आपल्या घोड्याला राजदूत म्हणून नियुक्त करण्याचा घाट घातला. पण त्याचा हा मानस सफल होण्यापूर्वीच कालिगुलाची हत्या करण्यात आली.
royal3
रशिया संपूर्णपणे आधुनिक परंपरांचे पालन करणारा आणि युरोपियन सत्तांशी बरोबरी करणारा देश असावा या उद्देशाने रशियन सम्राट पीटर द ग्रेट याने रशियन पुरुषांच्या दाढीवर कर लावला. जे पुरुष दाढी करीत नसत त्यांना हा कर भरावा लागत असे. पीटर द ग्रेट याचे सतराव्या शतकामध्ये रशियावर अधिपत्य होते. त्याकाळी पीटर द ग्रेट आणि इंग्लंडच्या राजा (आठवा) हेन्री या दोघांनी ही आपल्या देशांमध्ये दाढीवर कर लावले होते. परंतु रशियामध्ये दाढीवर कर लावण्यामागे कारण मोठे विचित्र होते. त्याकाळी युरोपीय देश अतिशय प्रगत, संपन्न समजले जात. रशियाला युरोपीय देशांप्रमाणे संपन्न कसे करता येईल हे जाणून घेण्यासाठी पीटरने वेष पालटून, युरोपीय देशांच्याच्या रीतीभाती, जीवनशैली, परंपरा समजून घेण्यासाठी त्या देशांमध्ये भ्रमंती सुरु केली. त्या काळी युरोपमध्ये पुरुष दाढी ठेवीत नसत. त्यामुळे रशियामध्ये परत आल्यानंतर पीटर द ग्रेट ने आपल्या देशातील दाढी ठेवणाऱ्या पुरुषांवर ‘दाढी कर’ लावण्यास सुरुवात केली. हा कर लावून रशिया देखील युरोप प्रमाणे संपन्न होईल अशी त्याची खात्री होती.

The post प्राचीन काळामध्ये राजे-महाराजांचे असे ही चित्रविचित्र समज-गैरसमज appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/2YhZpOE
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!