महाराष्ट्र

सध्या चर्चे आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तीन सराईत गुन्हेगारांसोबतचा फोटो

Share Now


औरंगाबाद : औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहमंत्र्याच्या शेजारी या फोटोमध्ये उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा एकावर दाखल आहे. दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे. तर अन्य एकावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी आरआर पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो समोर आला होता. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला. पण येथे गुन्हेगारांच्या मधेच गृहमंत्री असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहे. तर सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हे दाखल आहेत. यातील सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तो बराचकाळ जेलमध्ये होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील पोलीस हातकड्या घालून हजेरी लावत होता.

The post सध्या चर्चे आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तीन सराईत गुन्हेगारांसोबतचा फोटो appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/36ylfBY
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!