महाराष्ट्र

पाकिस्तानकडून दिशा रवीचे समर्थन; मोदी सरकारवर केली जोरदार टीका

Share Now


नवी दिल्ली : गेले अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून, आंततराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने केलेल्या ट्विटर टूलकिट प्रकरणी देशात दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर या वादात पाकिस्तानने आता उडी घेतली आहे. दिशा रवीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने ट्विट करत पाठिंबा दर्शवला आहे.

राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी संबंध असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले होते. यानंतर आता ट्विटर टूलकिट प्रकरणी इम्रान खान यांच्या पक्षाने पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.

मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार भारतात त्यांच्याविरोधात गेलेल्या प्रत्येकाला गप्प करण्यावर विश्वास ठेवते. यासाठी क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचा उपयोग करून घेणे लज्जास्पद होते. पण, आता त्यांनी टूलकिट प्रकरणात दिशा रवीला अटक केल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्रॅक्टर रॅली हिंसाचारात पाकिस्तानचा संबंध उघड दिल्ली पोलिसांनी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला असून, त्यामुळे दिशा रवीला पाठिंबा देऊन मोदी सरकारवर इम्रान खानच्या पक्षाने टीका केल्याचे सांगितले जात आहे.

तत्पूर्वी, पाच दिवसांची पोलीस कोठडी पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या दिशा रवीला सुनावण्यात आली आहे. दिशा रवीला शनिवारी दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांशी संबंधित टूलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याच्या प्रकरणात अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

The post पाकिस्तानकडून दिशा रवीचे समर्थन; मोदी सरकारवर केली जोरदार टीका appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3pmlQ0g
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!