नवी दिल्ली : हरियाणातील नेत्यांची शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य सतत समोर येत आहेत. अशातच काँग्रेस नेत्या विद्या देवी यांचे आता हरियाणाच्या कृषी मंत्र्यांनंतर वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विद्या देवी म्हणाल्या, की पैसे वाटून किंवा दारू वाटून आंदोलनात शेतकऱ्यांची मदत करा.
हे वक्तव्य विद्या देवींनी केले त्यावेळी तिथे काँग्रेसचे आमदार सुभाष गंगोली यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून विद्या देवी जींदच्या नरवानामधून विधानसभेसाठी उभा होत्या. यावेळी विद्या देवी म्हणाल्या, की जेव्हापासून काँग्रेस निवडणूक हारले आहे, तेव्हापासून पक्षाचे अस्तित्व संपले आहे. हे आंदोलन आता कसेतरी उभे राहिले असून आपल्याला प्रत्येक परिस्थितीत ते पुढे घेऊन जायचे आहे. त्या पुढे म्हणाल्या, की शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची मदत करा, मग ती पैसे असो किंवा दारू. दारूही या शेतकऱ्यांसाठी दान करू शकता. जितके शक्य होईल तितके सहकार्य करून हे आंदोलन पुढे घेऊन जा.
The post काँग्रेस नेत्या विद्या देवी म्हणतात; पैसे किंवा दारू वाटून आंदोलनात शेतकऱ्यांची मदत करा appeared first on Majha Paper.
from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3b6EtQX
via IFTTT
Add Comment