पॅरिस : 11 लाख युरोचा दंड भरण्याचे गुगल आयर्लंड आणि गूगल फ्रान्स यांनी अखेर कबूल केले आहे. गुगलच्या हॉटेल रँकिंग्ज या ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या असल्याचे एका तपासादरम्यान स्पष्ट झाले. सोमवारी फ्रान्सचे अर्थमंत्रालय आणि फ्रॉड वॉचडॉग यांनी हे स्पष्ट केले.
एका वक्तव्यात मंत्रालय आणि वॉचडॉग यांनी असेही म्हटले, की सप्टेंबर 2019 पासून त्यांच्या हॉटेल रँकिंग्जमध्ये गूगलने बदल केले आहेत. फ्रान्सच्या डेटा प्रायव्हसी रेग्युलेटरने मागच्याच वर्षी गूगल आणि अमेझॉनवर मोठा दंड लावला होता. गूगलवर तब्बल 10 कोटी युरोचा दंड लावला गेला होता. रेग्युलेटरकडून गूगलवर लावला गेलेला हा सर्वात मोठा दंड होता.
डेटा प्रायव्हसी कंपनी CNIL त्यावेळी म्हणाली होती, की अमेरिकेची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर याच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 35 मिलियन युरोज एवढा दंड लावला गेला होता. रेग्युलेटरला आढळले होते, की कम्प्युटर्सवर ऍडव्हरटायझिंग कुकीज सेव्ह करण्याआधी गूगल आणि अॅमेझॉनच्या फ्रेंच वेबसाइट्सनी व्हिजिटर्सची पूर्वानुमती घेतली नव्हती.
त्याचबरोबर CNIL ने म्हटले होते, की इंटरनेट युजर्सना गुगल आणि अमेझॉन ही स्पष्ट माहिती देण्यात अपयशी ठरले, की दोन्ही फर्म्सना ऑनलाईन ट्रॅकर्सचा वापर कशाप्रकारे करायचा आहे. आणि या दोन कंपन्यांनी हेसुद्धा सांगितले नव्हते, की त्यांच्या फ्रेंच वेबसाईट्सचे व्हिजिटर्स कुकीज वापरण्याला नकार कसे देऊ शकतील.
The post दिशाभूल केल्याप्रकरणी गुगलला भरावा लागणार 11 लाख युरोचा दंड appeared first on Majha Paper.
from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3amyOaj
via IFTTT
Add Comment