महाराष्ट्र

व्होडाफोन-आयडियाच्या या धमाकेदार ऑफर अंतर्गत रात्री मोफत वापरा अनलिमिटेड इंटरनेट डेटा

Share Now


नवी दिल्ली – एक शानदार ऑफर टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आणली आहे. कंपनीच्या ग्राहकांना या ऑफरनुसार मोफत अनलिमिटेड डेटा वापरता येईल. पण, हा अनलिमिटेड डेटा तुम्हाला 24 तासांसाठी नव्हे तर केवळ रात्रीच्या वेळेत मिळणार आहे.

रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत मोफत अनलिमिटेड डेटाचा फायदा ग्राहकांना घेता येईल. पण, युजरला यासाठी 249 किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे रिचार्ज करणे अनिवार्य आहे. याशिवाय अन्य कोणतीही अट या ऑफरसाठी कंपनीने ठेवलेली नाही. विशेष म्हणजे कंपनीकडून डेटा रोलओव्हरची सुविधाही मिळेल. म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत न वापरलेल्या डेटाचा वापर शनिवारी किंवा रविवारी करता येईल.

व्होडाफोन-आयडियाच्या वेबसाइटनुसार, ‘बिंज ऑल नाइट ऑफर’चा (Binge all night Offer) फायदा 249 रुपये, 299 रुपये, 398 रुपये, 399 रुपये, 449 रुपये, 499 रुपये, 555 रुपये, 595 रुपये, 598 रुपये, 599 रुपये, 795 रुपये, 819 रुपये, 1197 रुपये, 2,399 रुपये आणि 2595 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर मिळेल. नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइमच्या युजर्सनाही व्होडाफोन-आयडियाच्या या नव्या प्लॅनचा फायदा मिळेल. या प्लॅनअंतर्गत युजर्स रात्रीच्या वेळेत आवडता सिनेमा किंवा वेबसीरिज डाउनलोड करु शकतात.

The post व्होडाफोन-आयडियाच्या या धमाकेदार ऑफर अंतर्गत रात्री मोफत वापरा अनलिमिटेड इंटरनेट डेटा appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3jW1tpy
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!