महाराष्ट्र

अज्ञातवासात असलेले संजय राठोड अखेर १५ दिवसांनी सर्वांसमोर

Share Now


यवतमाळ – अखेर १५ दिवसांनी पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड समोर आले आहेत. संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासूनच अज्ञातवासात गेले होते. संजय राठोड यांचे नाव एका ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आल्यानंतर संजय राठोड यांच्याविरोधात भाजपने जाहीरपणे कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीसाठी रवाना झाले आहेत.

सकाळपासूनच संजय राठोड येणार असल्यानेच पोहरादेवीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीसाठी रवाना झाले असून तिथे गेल्यानंतर ते बंजारा समाजाला उद्धेशून भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे एवढे दिवस मौन बाळगणारे संजय राठोड आपली बाजू मांडताना नेमके काय बोलणार याची उत्सुकता आहे.

The post अज्ञातवासात असलेले संजय राठोड अखेर १५ दिवसांनी सर्वांसमोर appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/37Hzd5o
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!