महाराष्ट्र

‘एम्स’च्या संचालकांचा इशारा; कोरोनाचा महाराष्ट्रात आढळलेला नवा स्ट्रेन जास्त घातक

Share Now


नवी दिल्ली – कोरोना महाराष्ट्रात पुन्हा एकदा थैमान घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत वाढला असून, कोरोनाबाधितांचा वेगही वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, या संकटाबरोबर चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. देशात २४० नवीन कोरोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही या नवीन स्ट्रेनचा संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली. कोरोनाचे २४० नवे स्ट्रेन देशात आढळून आले असून, महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. हर्ड इम्युनिटी ही भारतात कल्पनाच ठरणार आहे. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीजची गरज आहे. महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनचा विचार केल्यास हे अवघड दिसत आहे. कारण या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो. इतकंच काय तर ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला.

गुलेरिया हर्ड इम्युनिटीबद्दल बोलताना म्हणाले विषाणूचे बदलेले रुप किंवा नवीन स्ट्रेनमध्ये प्रतिकार शक्तीपासून बचावाची क्षमता तयार झाली असल्यामुळे त्यापासून लसीमुळे वा कोरोनातून बऱ्या झालेल्या आणि अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या माणसांनाही धोका होण्याची शक्यता गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या उद्रेकाविषयी बोलताना महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही महत्त्वाची माहिती दिली. देशभरात कोरोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आल्यामुळेच कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असल्याचेही जोशी यांनी सांगितले.

The post ‘एम्स’च्या संचालकांचा इशारा; कोरोनाचा महाराष्ट्रात आढळलेला नवा स्ट्रेन जास्त घातक appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/2NPiNAT
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!