मुंबई : आज पहिल्यांदाच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर आले. आज यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जाऊन जगदंबामातेचे त्यांनी दर्शन घेतले. त्यांच्या शेकडो समर्थकांनी यावेळी प्रचंड गर्दी केली होती. माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
शिवजयंतीला शिवनेरीवर १४४ कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही… ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 23, 2021
शिवजयंतीला शिवनेरीवर 144 कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले. त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळे माफ आहे, असा घणाघात निलेश राणे यांनी केला.
The post पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर साधला निलेश राणेंनी निशाणा appeared first on Majha Paper.
from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3dMoiee
via IFTTT
Add Comment