महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल

Share Now


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन वेळेत बदला करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत.

सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत गट अ व गट ब वर्गातील अधिकारी 100 टक्के तर गट क व गट ड उपस्थित 50 % राहतील. 25 टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतील, तर 11 ते 5 या कालावधीत 25 टक्के कर्मचारी कार्यालयात असतील. उर्वरीत क व ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील, पण ज्यावेळी तातडीची आवश्यकता असेल, त्यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकतात. जे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार आहेत ते फोनवर उपलब्ध असणार आहे. गट क व गट ड 50 % कर्मचारी उपस्थित राहणार. त्यापैकी 25 टक्के सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत तर 25 टक्के कर्मचारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत उपस्थित राहतील.

मंत्रालयातील कार्यालयीन वेळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील, तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, जेणे करून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल. यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

The post कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3aOaxdb
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!