महाराष्ट्र

एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी

Share Now


मुंबई : एका दहशतवादी संघटनेने रिलायन्स समूहाचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याची जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडियावर याबाबत या संस्थेने पोस्ट केली आहे. पण गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कदाचित चर्चेत येण्यासाठी हे एखादी दहशतवादी संस्था करत असेल. आतापर्यंत तपासात असा कोणताही पुरावा याबाबत सापडलेला नाही.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्या प्रकरणी एखादी दहशतवादी संघटना जबाबदारी घेते, ते प्रसिद्ध होण्यासाठी करत आहे. असा दावा दिल्लीतील दूतावासाबाहेर स्फोट प्रकरणातही केला गेला होता. पण तपासात आतापर्यंत असा कोणताही पुरावा सापडला नाही. मुकेश अंबानी कोणताच पुरावा यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातील चौकशीतही सापडलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई पोलीस मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार उभी करणारे लोक कोण होते, याचा तपास घेत आहेत. पण पोलीस तपासात अद्याप कोणताही असा पुरावा सापडला नाही की तपास पुढे सरकू शकेल. या कटात वापरल्या गेलेल्या इनोव्हा कारचे फुटेज पोलिसांना सापडले असून आरोपी टोल नाक्यांवरून मुंबईबाहेर गेले असल्याचे यातून दिसत आहे.

दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरात शुक्रवारी (26 फेब्रुवारी) संध्याकाळी जिलेटिनच्या काड्यांनी सुसज्ज स्कॉर्पिओ कार सापडली होती. ही कार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलियापासून अवघ्या 600 मीटर अंतरावर पार्क केली होती.

स्फोटके आणि धमकीचे पत्र मुकेश अंबानींच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. चिठ्ठीत लिहिले होते की, नीता भाभी आणि मुकेश भैया ही तर झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण होऊन येईल. संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची व्यवस्था केली गेली आहे. काळजी घ्या. घटनास्थळी सापडलेली स्कॉर्पियो कार ही काही दिवसांपूर्वीच चोरीला गेली होती. याबाबत पोलिसातही तक्रार करण्यात आली होती.

The post एका दहशतवादी संघटनेने स्वीकारली मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/37Uc280
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!