महाराष्ट्र

इंटरपोलने चीन, आफ्रिकेत जप्त केली नकली करोना लस

Share Now

कोविड १९ प्रसारानंतर जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरु झाले असतानाच नकली लस केसेस समोर आल्या आहेत. जागतिक पोलीस संघटना इंटरपोलने बुधवारी द.आफ्रिकेतील जोहान्सबर्ग मधील एका गोदामातून बनावट करोना लसीच्या ४०० बाटल्या जप्त केल्या आहेत. यातून २४०० जणांना लस पुरविली गेली असती असे समजते. या प्रकरणात तीन चीनी आणि एक झांबियान अश्या चौघांना अटक केली गेली आहे. इंटरपोलच्या म्हणण्यानुसार ही नकली लस म्हणजे बड्या रॅकेटचे संकेत असून हा केवळ हिमनगाचा छोटा तुकडा असावा.

चीनी पोलिसांनी सुद्धा नकली लस बनविणाऱ्या युनिटवर छापा घालून ३००० बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात ८० संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नकली उत्पादकांनी लसीच्या वितरणाची व्यवस्थाही केली होती. या प्रकारात काही खासगी नर्सिंग होम व हॉस्पिटल सामील असल्याचेही समोर आले आहे.

ज्या देशातून करोना वरील लसीना परवानगी दिली गेली आहे, तेथे कुठेच या लसीची ऑनलाईन विक्री करण्यास परवानगी दिली गेलेली नाही. त्यामुळे डार्क वेबवर कुठल्याही संस्थेची लसीची ऑफर असेल तर ती नकली आणि बेकायदा आहे याची नोंद घेतली जावी असा इशारा दिला गेला आहे.

The post इंटरपोलने चीन, आफ्रिकेत जप्त केली नकली करोना लस appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3qfVZYl
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!