महाराष्ट्र

बुलडाण्यातील कोविड सेंटरमधील अजब प्रकार; स्वॅब न देताच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Share Now


बुलडाणा : तुमची कोरोना चाचणी न करता तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज तुम्हाला जर आला तर तुमची मानसिक अवस्था काय होईल याचा विचारच न केलेला बरा… पण असा अनुभव बुलडाणा जिल्ह्यातील पंडितराव देशमुख यांना आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी बुलडाण्यातील मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये मोताळा शहरात असलेले नागरिक पंडितराव देशमुख यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते मोताळा येथील कोविड सेंटरमध्ये तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी केवळ आपली नाव नोंदणी केल्यानंतर पंडितराव देशमुख यांना संबंधित डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तपासणीसाठी वेळ दिला. पण या ठिकाणी ते परत तपासणीसाठी गेलेच नाही.

त्यानंतर कोविड सेंटरमधून त्यांना काल फोनद्वारे सांगण्यात आले की तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुम्ही कोरोना सेंटरमध्ये यावे आणि उपचार घ्यावे. कोरोनाचा स्वॅब न देताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पंडितराव यांना धक्का बसला. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला? असा प्रश्न त्यांना पडला आहे. मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये जाऊन त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे मिळाली.

यावरूनच मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये काय सुरु आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. या मोताळा येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णाचा स्वॅब न देता रुग्ण पॉझिटिव्ह येतात तरी कसे? याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र पूरी यांना विचारणा केली असता त्यांनी सॅम्पल कन्टेनरला चुकून दुसऱ्याचे नाव टाकले गेल्याची चूक कबुल केली. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालणाऱ्या जिल्ह्यातील कोविड सेंटर कशी चालतात अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

The post बुलडाण्यातील कोविड सेंटरमधील अजब प्रकार; स्वॅब न देताच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/38h9Ibd
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!