महाराष्ट्र

अशा सोप्या पद्धतीने बनवा खमंग व खुसखुशीत शेंगदाणे

Share Now

mungfali

आपल्या पैकी कित्येकजण हे खाण्याचे शौकिन असतात. त्यातील काहीजणांना फास्टफूड खुप आवडते आणि चाट म्हटले तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण पदार्थ बाहेर खाणे किती योग्य आहे ते आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला घरच्या घरी खमंग खुसखुशीत शेंगदाणे बनवण्याची कृति सांगणार आहोत.

साहित्य – शेंगदाणे 500 ग्रॅम,मैदा एक वाटी, कॉर्न फ्लॉर दोन मोठे चमचा, लाल मिरची पावडर, चाट मसाला एक चमचा, मीठ दीड चमचा, गरम मसाला एक चमचा, आमचूर अर्धा चमचा, काळे मीठ एक चमचा, जिरेपूड दोन चमचे, तेल तळण्यासाठी.

विधी – शेंगदाण्यात संपुर्ण मिश्रण टाका आणि नंतर पाणी टाकून मिश्रण एकत्र करुन घ्या. पॅनमध्ये तेल गरम करा. मध्यम आचेवर शेंगदाणे क्रिस्पी होई पर्यंत तेळावेत.नंतर शेंगदाणे काढून घेऊन त्यावर चट मसाला टाका आणि थंड झाल्यानंतर त्याला हवा बंद डब्यात ठेवा हे नमकीन शेंगदाणे महिन्याभर खराब होत नाहीत.

The post अशा सोप्या पद्धतीने बनवा खमंग व खुसखुशीत शेंगदाणे appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3kS2saV
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!